अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :- राष्ट्रवादीचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी आजचा रक्षाबंधन सण अनोख्या पद्धतीने साजरा करत बहीण-भावाच्या नात्याचं एक सुंदर उदाहरण सगळ्यांसमोर ठेवलं आहे.
आमदार रोहित पवार यांनी आज ससून आणि नायडू रुग्णालयांना भेट दिली आणि रुग्णालयातील नर्ससोबत रक्षाबंधन साजरं केलं. यंदाच्या रक्षाबंधन सणावर कोरोनाचं सावट आहे.
कोरोनामुळे आज अनेकांना रक्षाबंधन साजरं करता येणार नाही. कोरोनाच्या जीवघेण्या महामारीमुळे संपूर्ण आरोग्यव्यवस्था कामाला लागली आहे.
डॉक्टर, नर्स, सफाई कामगार हे गेल्या कित्येक महिन्यांपासून काम करत आहे. त्यामुळे आपली रक्षा करणाऱ्या खऱ्या बहिणींसोबत रक्षाबंधन साजरा करण्यासाठी रोहित पवार हे आज रुग्णालयांची भेट घेत आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा