अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :- एकीकडे कोरोनाचे संकट डोक्यावर असताना एकीकडे गुन्हेगारी कृत्येही थांबायला तयार नाहीत. अशीच एक धक्कादायक घटना अहमदनगर मधील मुकुंदनगर मध्ये घडली.
याठिकाणी एका टोळक्याने डॉक्टरसह मुलगा आणि भाच्याला जबर मारहाण केली. डॉ. सय्यद उम्रान हमिद (वय- 41), त्यांचा मुलगा सय्यद अब्दुल कादीर उम्रान व भाचा शेख सैफ आश्पाक (रा. मुकुंदनगर) अशी जखमींचे नावे आहेत.
याप्रकरणी डॉ. सय्यद यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मोसिन मुसा शेख, तौफिक मुसा शेख, आर्यन शाकीर शेख, मोईन मोहसीन शेख (रा. मुकुंदनगर) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी: मागील काही महिन्यांपूर्वी फिर्यादी यांच्या मुलास आरोपींनी बळजबरीने दुचाकीवर बसवून पळून नेण्याचा प्रयत्न केला होता.
ते सर्वजण फिर्यादी यांच्या मुलाला शनिवारी दुपारी दिसल्याने त्याने फिर्यादीस याबाबत कल्पना दिली. तेव्हा फिर्यादी हे त्याच्या मुलगा व भाचा यांना घेऊन मुकुंदनगर येथील आयशा मज्जीदजवळ आरोपीकडे गेले होते.
तेव्हा तेथे असलेल्या मुलांना फिर्यादी म्हणाले, तुम्ही माझ्या मुलाला दुचाकीवर का बसविले होते. तेवढ्यात त्यांचे वडिल त्याठिकाणी आले व त्यांनी फिर्यादी,
त्यांचा मुलगा व भाच्याला मारहाण केली. तेव्हा फिर्यादी त्यांना म्हणाले, तुमच्या मुलांनी माझ्या मुलाला उचलण्याचा प्रयत्न केल्याचा पुरावा आहे.
तेव्हा फिर्यादी आरोपींना घेऊन इनामी मज्जीदजवळ सीसीटीव्ही फुटेज पाहण्यासाठी गेले. तेथे फिर्यादीच्या मुलास मोसिम शेख याने दगडाने मारहाण केली. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला आहे. तसेच इतर आरोपींनी डॉक्टर व त्यांच्या भाच्याला मारहाण केली.
-
-
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com