झाडाला गळफास घेत चुलता-पुतणीची आत्महत्या

Ahmednagarlive24
Published:

अकोले :- तालुक्यातील कोल्हार-घोटी राज्यमार्गालगत असलेल्या नागमोडी वळणाच्या विठे घाटात एका झाडावर लटकलेल्या अवस्थेत स्त्री व पुरुषाचा मृतदेह बुधवारी दुपारी परिसरातील काही मेंढपाळांना दिसले.

याबाबत खबर मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हे मृतदेह चुलता व पुतणीचे असल्याचे समजते. याप्रकरणी राजूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास विठे घाटाच्या दुसऱ्या वळणावर दरीत झाडाला ब्लँकेटच्या तुकड्याच्या साहाय्याने लटकलेल्या अवस्थेत पुरुष व मुलीचा मृतदेह मेंढ्या चारणाऱ्या मेंढपाळांना दिसला.

एक मृतदेह भारती रामदास जाधव (वय १७, राहणार पाभुळवंडी, तालुका अकोले) हिचा असून तिने मंगळवारी सकाळी दहावीचा रिपिटरचा पेपर दिला होता.

दुसरा मृतदेह तिच्याच चुलत्याचा आहे. दोन्ही मृतदेह पोलिसांनी राजूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले. हा प्रकार आत्महत्येचा आहे की, हत्येचा याची उकल पोलिस करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment