उपचार घेत असतानाच दोन कोरोनाबाधित रुग्ण पळाले आणि २७ नातेवाईकांना ….

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ होत असतानाच अकोले तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर अली आहे दोन कोरोनाबाधित रुग्णांनी उपचार सुरु असतानाच धूम ठोकली आणि एक दोन नव्हे तर तब्बल सत्तावीस लोकांच्या संपर्कात आले आहेत.

उपचार घेताना पुणे व चाकण येथे कामाला असलेले दोघेजण कोरोना पॉझिटिव्ह निघाले. हे बहाद्दर उपचार घेत असतानाच पळाले. अन २७ नातेवाईकानाही भेटून आले. कंपनीतील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरी फोन करून ते पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले. तोपर्यंत पोलिस, आरोग्य कर्मचारी व १०८ रुग्णवाहिका रात्री ते घरात झोपलेले असताना पोहचली.

दरम्यान, हॉस्पिटलमधून पाळल्यावर एकजण धामनवन व एकजण बांगरवाडी (कौठवाडी) येथे पोहचला. आरोग्य प्रशासनाच्या ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी या घटनेची माहिती नगर आरोग्य विभाग व पोलिस यांना कळवली. मग त्या दोघांची शोधा शोध झाली.

त्यातील एकाने घरी न जाता थेट धामणवन या आपल्या सासुरवाडीला धूम ठोकली. मात्र पोलिस व आरोग्य विभागाने त्यांचा शोध घेऊन अखेर त्यांना खानापूर (ता. अकोले) येथील कोव्हिड केंद्रात दाखल केले. तर त्यांचे नातेवाईकही संस्थात्मक क्वारंटाईन करून त्यांचे स्वाब तपासणीसाठी नगर येथे पाठविण्यात आले आहेत.

बांगरवाडी येथील २२ वर्षाचा तरुण एका खाजगी कंपनीत नोकरीला होता. तर मूळचा कातळापुर येथील २९ वर्षाचा तरुण चाकण येथील कंपनीत काम करीत होता. त्या दोघांनाही कोरोनाचीबाधा झाली. त्यांना पुणे येथील आरोग्य विभागात दाखल करण्यात आले.

मात्र हे दोघे बहाद्दर रात्रीच तेथून आले. एकाच रूममध्ये राहणारे अजून दोघे चिंचवणे येथील तेही त्याच्या सोबत पळाले.ही माहिती समजताच धामनवन, कौठवाडी, कातळापुर येथील ग्रामस्थांनी चिंता व्यक्त करून गावात अजून कोणी नवीन आले आहेत काय? याचा शोध सुरू केला आहे.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment