दोन ते तीन दिवसात परिस्थिती पाहुन जनता कर्फ्यू

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :-नेवासे शहरात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहर लाॅकडाऊन करायचे का?, यासाठी विचार करण्यासाठी नगरपंचायतीने सोमवारी नगरपंचायत प्रांगणात व्यावसायिक, नागरिक, राजकीय पदाधिकाऱी यांची आयोजित बैठकित निर्णय झाला नाही.

दोन ते तीन दिवसात परिस्थिती पाहुन जनता कर्फ्यू करण्याचा बैठकीत निर्णय होणार आहे. या बैठकीत उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील,

संजय सुखदान, नितीन दिनकर, सतिष पिंपळे, अशोक गुगळे, विजय गांधी, भाऊसाहेब वाघ, मनोज पारखे, सचिन नागपुरे, राजेंद्र मुथ्था,

भास्कर कणगरे, इम्रान दारुवाले, आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. मागील चार महिन्यात शहरात चार रुग्ण आढळून आले होते. मात्र आता रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

शहरातील विविध भागात रुग्ण आढळून येत आहेत. प्रत्येक प्रभागात कमेटी नेमावी व परिसरात कुणाला कोरोनाचे लक्षणे आढळल्यास प्रशासनास कळवावे.

नगरपंचायत ते खोलेश्वर गणपती मंदिरा पर्यंत होणाऱ्या गर्दीवर उपाय करा, काही नागरीक विनाकारण चौका चौकात गाड्या लावुन गप्पा मारत बसतात तर तरुण शहरात विनाकारण फिरतात.

अनेक व्यावसायिक नियम पाळत नाही. नगरपंचायत कर्मचार्याना दमदाटी करतात. बैठकीत नागरिक व व्यावसायिक यांनी जनता कर्फ्यू करावा

व सध्या काही दिवस जनता कर्फ्यू करु नये, अशी वेगवेगळी मते व्यक्त केल्याने दोन ते तीन दिवसात परिस्थिती पाहुन जनता कर्फ्यू करण्याचा बैठकीत निर्णय झाला.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment