अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :- अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येचे कारण समोर आलेले नसले तरी यावरून भलतेच राजकारण तापलेले दिसत आहे. अनेक बडे बडे नेते यात उडी घेत आहेत.
आता या प्रकरणात महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्यावरही वेगळेच आरोप केले जात आहेत.
ते रिया चक्रवर्तीला सोबत घेऊन गाडीमधून फिरतायत असा एक मेसेज एका फोटोसह व्हायरल होतं आहे. सध्या ट्विटवर व्हायरल होत आहे.
आदित्य ठाकरे हे गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर बसल्याचे दिसत असून त्यांच्या बाजूला एक महिला बसल्याचे दिसत आहे. ही माहिला म्हणजे अभिनेता सुशांत सिंह राजपूतची प्रेयसी असल्याचा दावा केला जात आहे.
सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणावरुन मुंबई पोलीस आणि बिहार पोलिसांमधील वाद समोर येत असतानाच आदित्य ठाकरे हे सुशांतची कथित प्रेयसी रिया चक्रवर्तीसोबत फिरत असल्याचा दावा काही ट्विटर अकाउंटवरुन करण्यात आला आहे.
महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधताना आदित्य ठाकरेंचा हा फोटो उत्तर भारतामधील काही ट्विटर हॅण्डलवरुन व्हायरल करण्यात आला आहे.
* परंतु हे आहे सत्य –
व्हायरल केला जाणारा हा फोटो अभिनेत्री दिशा पटानीचा आहे. हा फोटो २०१९ साली आदित्य आणि दिशा एकत्र डिनरसाठी गेलेले असताना काढण्यात आला होता.
सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडून केला गेला पाहिजे अशी मागणी करण्यासाठी खोट्या माहितीसहीत आदित्य आणि दिशा यांचा हा फोटो व्हायरल करण्यात येत असल्याचे स्पष्ट होतं आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा