पारनेर :;- यापुढील काळात पक्षापेक्षा जनतेची कामे करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीशी उभे राहण्याचे सूचित करत माजी जि. प. उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपली घुसमट होत असल्याची अप्रत्यक्ष कबुली दिली.
ढवळपुरी येथे वाघवाडी ते गावाडे वाडी रस्त्याचे भूमिपूजन झावरे यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधताना राजकीय भाष्य केले.
विधानसभा निवडणुकीसाठी झावरेे यांच्यासह प्रशांत गायकवाड, नीलेश लंके यांची नावे चर्चेत असून पक्षश्रेष्ठींकडून लंके व गायकवाड यांनाच पाठबळ दिले जात आहे.
या पार्श्वभूमीवर पक्षाच्या वतीने घेण्यात आलेल्या मुलाखतीनंतर नव्याने पक्षात दाखल झालेल्या व्यक्तींना उमेदवारी न देण्याची मागणी झावरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली होती.
- नेप्ती उपबाजार समितीच्या ७ एकर जागेमधून मुरुम उत्खनन करणाऱ्या टोळीवर कारवाई करा – अमोल येवले
- महापालिकेने पाणीपट्टी दारात केलेली वाढ त्वरित रद्द करावी – आ.संग्राम जगताप
- पुणे-सोलापूर महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ ठिकाणी तयार होणार तीन नवे उड्डाणपूल
- बिल देण्याच्या कारणावरून साकूरमध्ये हाणामारी ; १७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल, सकल हिंदू समाजाचे गावबंद आंदोलन
- ‘आध्यात्मिक शक्तीपीठ म्हणून भगवानगडाची ओळख’ ; भगवान गडावर भाविकांची अलोट गर्दी