अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :- केंद्रीय लोकसेवा आय़ोगाने 2019 मध्ये घेतलेल्या परीक्षेचे निकाल मंगळवारी जाहीर झाले आहेत. सप्टेंबर महिन्यात याची लेखी परीक्षा झाली होती. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये मुलाखती पार पडल्या होत्या. त्यानंतर आता युपीएससीने मेरीट लिस्ट प्रसिद्ध केली आहे.
त्याच्या घरात शिकलेले कोणीच नाही,आई वडील दोन्हीही शेती करणारे,मुलानेही शेतीची पदवी घेतली पण शेतीत न अडकता त्याने यूपीएससी मध्ये यश संपादन करत प्रशासकीय सेवेत पदार्पण केले आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील मोहरी गावातील महेश बाळासाहेब गीते याने तिसऱ्या प्रयत्नात त्याने हे यश संपादन केले आहे. जामखेड तालुक्यात असलेल्या या मोहरी गावात सध्या जल्लोषाचे वातावरण आहे.
गावातील मुलगा यूपीएससी उत्तीर्ण झाल्याने गावकऱ्यांमध्ये उत्साह आहे. नुकत्याच घोषित झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) निकालामध्ये देशातून ओबीसी मधून 399 वा रँक जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील मोहरी गावचा महेश बाळासाहेब गीते यांनी मिळवला आहे.
आई आणि वडील दोन्ही शेती करणारे त्यामुळे महेश ने कृषी पदवी घेतल्यानंतर दिल्ली येथे जाऊन क्लास केले .पहिल्या दोन प्रयत्नात त्याला यश न मिळाल्याने खचून न जाता तिसऱ्या प्रयत्नात त्याने यश मिळविले.
महेश याचे प्राथमिक शिक्षण मोहरी गावात झाले त्यानंतर माध्यमिक शिक्षण अहमदनगर येथील आनंद माध्यमिक विद्यालयात पूर्ण केल्यानंतर पदवी पुण्यातील कृषी महाविद्यालयातुन पूर्ण केली.
आज या यशाबद्दल महेशच्या आई वडिलांना आनंद झाला असून गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.महेशच्या यशाचे जिल्हाभरातून कौतुक होत आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved