शेंडी विद्यालयाचा दहावीचा 93% निकाल

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,5 ऑगस्ट 2020 :-  सन 2019 -20 या शैक्षणिक वर्षातील मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल लागला असून या परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल विद्यालय, शेंडी या शाळेने उत्कृष्ट निकालाची परंपरा याही वर्षी कायम राखली.

विद्यालयाचा निकाल ९३ % लागला असून सर्वच स्तरातून शाळेचे, विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे. या दहावीच्या परीक्षेत ओंकार कासार ४७६ गुण मिळवत प्रथम आला. तर वेदांत शिंदे याने ४६९ गुण मिळवत द्वितीय क्रमांक पटकाविला.

अनुष्का सरोदे हिने ४६१ गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला. या परीक्षेत विद्यालयातील १७ विद्यार्थ्यांनी ९०% पेक्षा जास्त गुण मिळवत यश संपादन केले आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांचे अ.जि.म.वि.प्र.संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे, उपाध्यक्ष रा.ह. दरे, सचिव जी. डी. खानदेशे, सहसचिव ॲड. विश्वासराव आठरे, खजिनदार डॉ.विवेक भापकर व संस्थेचे सर्व सदस्य, विद्यालयाचे मुख्याध्यापक रघुनाथ झिने,

माजी मुख्याध्यापक कांडेकर बी.डी., पर्यवेक्षक गोबरे व्ही. एच., तसेच शेंडी व पोखर्डी येथील सरपंच व सदस्य तसेच ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांना भिसे बी. वाय., मोढवे ए. एस., मोरे एम. एच., मरकड व्ही. के., दरे एस.यू ., पायमोडे आर.के., म्हस्के एम. ए. आदी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment