अहमदनगर Live24 टीम,5 ऑगस्ट 2020 :- शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होवून काम करणारा नेता म्हणून अनिल भैय्या राठोड यांची आठवण प्रत्येकाच्या मनामध्ये घर करून राहील आशा शब्दात माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या.
आपल्या शोकसंदेशात आ.विखे पाटील यांनी म्हणले आहे की,अनिल राठोड यांच्या निधनाचे वृत सर्वानाच धक्कादायक आणि तेवढेच वेदना देणारे आहे.आपल्या राजकीय सामाजिक कारकीर्दीत संघर्ष करून सामान्य माणसाला न्याय देण्याची त्यांची भूमिका होती.
एका विचारांशी बांधिलकी मानून त्यासाठी अखंडपणे लढा देणारे नेतृत्व जनसामान्यांमध्ये त्यांनी निर्माण केलेले नाते न विसरता येणारे असल्याचे आ.विखे म्हणाले.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved