अहमदनगर Live24 टीम,5 ऑगस्ट 2020 :- आज सकाळी नगर शहराचे माजी आमदार अनिल राठोड यांचे निधन झाले,शिवसेना उपनेते माजी मंत्री अनिल राठोड यांच्या निधनाबददल राज्यभरातील सर्वपक्षीय नेते, पदाधिकार्यांनी दु:ख व्यक्त करीत भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली आहे.
अनेक नेत्यांनी व्टिटर तसेच सोशल मिडियातून राठोड यांना श्रध्दांजली अर्पण करीत लोकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारा नेता हरपल्याची भावना व्यक्त केली आहे.
नगर शहराचे विद्यमान आमदार संग्राम जगताप यांनीही आमदार अनिल राठोड यांच्या निधनाबाबत प्रतिक्रिया दिली आहे त्यात ते म्हणाले, अनिल राठोड यांच्या निधनाने शिवसैनिकांची मोठी हानी झाली आहे.
नगर शहराचे २५ वर्षे प्रतिनिधीत्त्व करणारे, प्रखर हिंदुत्त्ववादी म्हणून ओळख असलेले अनिल राठोड यांचे निधन वेदनादायी आहे.
राजकीय विचार वेगळे असले, तरी शहराचे नेतृत्त्व म्हणून त्यांचा नेहमीच आदर असायचा. सर्वसामान्यांसाठी ते नेहमीच कार्यरत होते. त्यांच्या निधनाने राठोड कुटुंबियावर ओढवलेले दुःख मोठे आहे.
तसेच शिवसेना आणि कटर शिवसैनिकासाठीही ही मोठी हानी आहे. सर्वांना या धक्क्यातून सावरण्याची ताकद परमेश्वराने द्यावी, हीच प्रार्थना अशी प्रतिक्रिया आ. संग्राम जगताप यांनी दिली आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved