अहमदनगर :- अकोले तालुक्याचे राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड येत्या दोन-तीन दिवसांमध्ये भाजपात प्रवेश करणार आहेत.
त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून अहमदनगर शहरातील राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप आणि श्रीगोंदा मतदारसंघातील आमदार राहुल जगताप हेही भाजपामध्ये जाण्यास उत्सुक आहेत.
मात्र पिचड यांना ‘एन्ट्री’ दिलेल्या भाजपातून दोन्ही जगतापांना मात्र ‘नो एन्ट्री’चा बोर्ड दाखविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
शहराचे आमदार संग्राम जगताप यांनीही भाजपात जाण्यासाठी जोरदार फिल्डींग लावली. श्रीगोंद्याचे आमदार राहुल जगताप हेही भाजपमध्ये जाण्यास इच्छुक आहेत.
मात्र नगर शहर आणि श्रीगोंदातील परिस्थिती पाहता दोघांनाही भाजपामध्ये घेण्यास नेतृत्व सकारात्मक दिसत नाही. पक्षामध्ये यायचे असेल तर ‘उमेदवारी मागू नका’ अशीही अट त्यांच्यासमोर ठेवण्यात आली आहे.
- लोकसर्जन – मा.आ.डॉ सुधीर तांबे.
- राज्यातली सर्वात मोठी बातमी ! मुंबई, पुण्यासह राज्यभरात ‘धुरळा’ उडणार; महापालिका, ZP निवडणुका…
- डॉ. सुधीर तांबे : कर्तृत्व, दातृत्व व नेतृत्व या तीन गुणांचा संगम
- नेता नव्हे मित्र – मा.आ.डॉ.सुधीर तांबे
- महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मालमत्तांचे खासगी संस्थेमार्फत सर्वेक्षण सुरू