अ‍ॅड. प्रताप ढाकणे विधानसभा निवडणूक लढविणार !

Ahmednagarlive24
Published:

पाथर्डी :- राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभेच्या निवडणुकीसाठी मुलाखत देणारे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांनी काल कार्यकर्ता मेळाव्यात कोणत्याही परिस्थितीत विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्धार जाहीर केला आहे.

संस्कार भवनात आयोजित करण्यात आलेल्या या निर्धार मेळाव्यात बहुतांश कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी सोडून दुसर्‍या पक्षातून निवडणूक लढवावी असा आग्रह धरला. 

तर अनेकांनी भाजपा, शिवसेना किंवा बहुजन वंचित आघाडीचा पर्याय स्वीकारण्याचे आवाहन केले.

उपस्थित कार्यकर्त्यांचा जोश पाहून ढाकणे म्हणाले कोणाच्या उपकारावर नाही तर तुमच्या ताकतीवर हा वाघाचा पठ्ठा निवडणूक लढवल्याशिवाय राहणार नाही.

पाथर्डी शेवगाव मतदार संघ सामाजिक व राजकीयदृष्ट्या प्रदूषित झाला आहे. त्याचा परिणाम म्हणून या मतदारसंघाचे सामाजिक स्वास्थ्य बिघडले आहे,

आणि या सामाजिक स्वास्थ्याला दुरुस्त करण्यासाठी आपणच चिन्ह कुठले असेल माहित नाही, मात्र आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment