फेसबुकवर वादग्रस्त मॅसेज टाकणाऱ्या तरुणास अटक

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,6 ऑगस्ट 2020 :- श्रीरामपूर शहरात वार्ड नंबर २ येथील तौफिक शब्बीर शेख याला फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट टाकल्याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसांनी अटक केली आहे.

पोनि. अमोल गायकवाड यांच्या फिर्यादीवरून आरोपी तौफिक शब्बीर शेख रा.वार्ड नं. २ याच्याविरुद्ध भादवि कलम १५३, अ, प्रमाणे जातीय तेढ निर्माण करण्याचा गुन्हा नंबर १२९२ दाखल करण्यात आला.

फिर्यादीत पोनि.अमोल गायकवाड यांनी म्हटले आहे की, अयोध्या येथील श्रीराम मंदिराचे भूमीपूजन होणार ते माहीत असताना आरोपी तौफिक शब्बीर शेख

याने त्याच्या स्वत:च्या फेसबुकवरून अयोध्येमध्ये असणारी बाबरी मस्जिद पाडल्यामुळे बाबरी मस्जिद तेरा बदला है कर्ज हम पर,

असा मेसेज टाकला असून त्याखाली मुस्लिम युवकांनी त्यावर कॉमेंट केलेल्या असून त्यावर त्यांनी कुत्ते की मौत मरेंगे असा रिप्लाय दिला आहे.

त्यामुळे दोन जातीमध्ये व गटामध्ये शत्रुत्व वाढून श्रीरामपूर शहरातील एकोपा धोक्यात आणणारी व हिंदु, मुस्लीम एकोपा टिकविण्यास बाधा निर्माण होईल, असे कृत्य केले आहे.

असे फिर्यादीत म्हटले असून पोनि बहिरट यांच्या मार्गदर्शनाखाली हे.कॉ. साळवी हे पुढील तपास करीत आहेत. आरोपी तौफिक शब्बीर शेख हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून तडीपार होता. त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe