महाराजांना न्यायालयात हजर राहण्याची व जामीन देण्याचीही आवश्यकता नाही

Published on -

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :-निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्याविरोधातील याचिकेच्या सुनावणीला वरिष्ठ जिल्हा सत्र न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे महाराजांना तूर्त दिलासा मिळाला. त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते.

प्रसूतीपूर्व गर्भलिंग चिकित्सा नियंत्रण कायद्याचा भंग केल्याचा आरोप करत संगमनेर येथील प्रथमवर्ग न्यायालयात दाखल झालेल्या अर्जावर सुनावणी सुरू आहे.

महाराजांच्या वतीने वकील के. डी. धुमाळ यांनी प्रथम वर्ग न्यायालयाच्या ‘त्या हुकूमाविरुद्ध’ जिल्हा सत्र न्यायालयात शुक्रवारी रिव्हीजन अर्ज दाखल केला.

तक्रार कायदेशीर नाही. कीर्तनातील एका वाक्याचा आधार घेऊन केलेल्या विधानामुळे गुन्हा दाखल होऊ शकत नाही. ग्रंथांमधील संदर्भ दिल्याने गुन्हा ठरत नाही, असा युक्तिवाद वकील धुमाळ यांनी केला.

संगमनेर येथील जिल्हा सत्र न्यायालयाने प्रथमवर्ग न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीला तुर्तातूर्त स्थगिती दिली. पुढील सुनावणी २० ऑगस्टला जिल्हा सत्र न्यायालयात होणार आहे.

यावेळी सरकारी पक्षाला बाजू मांडावी लागणार आहे. सध्यातरी महाराजांना न्यायालयात हजर राहण्याची व जामीन देण्याचीही आवश्यक्ता नाही, असे त्यांच्या वतीने बाजू मांडणारे अ‍ॅड. धुमाळ यांनी सांगितले.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News