अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमणाचे प्रमाण वाढत चालले आहे. कोपरगाव तालुकाही याला अपवाद राहिलेला नाही.
काही दिवसांपूर्वी कोपरगाव तालुक्याने योग्य नियोजन करत तालुका कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न केला होता परंतु पुन्हा कोरोनाने या ठिकाणी आपले पाय रोवले आहेत.
मागील काही आठवड्यांपासून कोपरगाव तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. गुरुवारी एकाच दिवसात 65 कोरोना बाधित रुग्णांमुळे गेल्या सहा महिन्यांतील सर्वात मोठ्या रुग्ण वाढीचा विक्रम केला.
त्या रुग्णांच्या संपर्कातील 33 अहवाल पॉझिटिव्ह आले असून ब्राम्हणगाव येथील 82 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.
तालुक्यात 7 ऑगस्टपर्यंत 310 रुग्ण पॉझिटिव्ह असून 200 रुग्ण अॅॅक्टिव्ह आहेत. गुरुवारी आढळलेल्या 65 रुग्णांच्या संपर्कातील ३३ रुग्णांत रवंदे येथे सात, पोहेगाव येथे चार रुग्ण,
जेऊर पाटोदा येथील 11 महिन्यांचे बाळ व 2 स्रिया, टाकळीत 24 वर्षीय तरुण व2 स्रिया , संजीवनी कारखाना येथील 31 वर्षीय पुरुष तर 2 स्रिया, सोनारी येथील 35 वर्षीय पुरुष व 40 वर्षीय स्त्रीचा समावेश आहे.
कारवाडी येथील 75 वर्षीय पुरुष, 2 स्रिया, कोळगाव थडी येथे 79 वर्षीय स्त्री व निवारा परिसर येथे एक 28 वर्षीय स्त्री बाधित आढळली आहे. तर टाकळी फाटा येथे 40 वर्षीय पुरुष,
ब्राम्हणगाव येथे 41 वर्षीय पुरुष,शिंगणापूर येथे 67 वर्षीय पुरुष ,येसगाव येथे 50 वर्षीय पुरुष,चांदेकसारे येथे 65 वर्षीय पुरुष, अंचलगाव 62 वर्षीय पुरुष आदी रुग्णांचा समावेश आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved