‘त्या’ प्रकरणासंदर्भात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे चौकशीचे आदेश

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :-नेवासा तालुक्यातील बहिरवाडी येथील गट नंबर 39 मधील बेकायदा वाळू उत्खननचा मूळ पंचनामा गायब करून नेवासा तहसील कार्यालयाने बनावट पंचनामा केला असल्याची तक्रार करण्यात आली होती.

या प्रकरणी आलेली तक्रार तपासून उचित कार्यवाही करण्याचे आदेश महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत, अशी माहिती माहिती अधिकार कार्यकर्ते काकासाहेब गायके यांनी दिली.

गायके यांनी दि.12 मार्च 2020 रोजी मुख्यमंत्री व महसूल मंत्री यांकडे सदर तक्रार केली होती. नेवासा तालुक्यातील बहिरवाडी येथील गट नंबर 39 मध्ये 1200 ब्रास वाळूचे बेकायदा उत्खनन झाल्याचा

पंचनामा एक मंडळअधिकारी व चार तलाठी यांचे संयुक्त पथकाने केला होता. मात्र नंतर हा मूळ पंचनामा गायब करून केवळ 118 ब्रासचा बनावट पंचनामा तयार करून मुळ पंचनाम्याच्या सत्यप्रती नष्ट केल्याचा आरोप यात त्यांनी केला होता.

त्यानुसार महसूल विभागाचे नुकसान करणार्‍यावर नियमानुसार कारवाई करण्यात यावी अशी मागणी काकासाहेब गायके यांनी केली होती.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment