अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात काल (शुक्रवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ६४६ ने वाढ झाली. यात, जिल्हा रुग्णालय कोरोना टेस्ट लॅब ३९, अँटीजेन चाचणीमध्ये ३११ आणि खाजगी प्रयोगशाळा तपासणीत २९६ रूग्ण बाधीत आढळून आले.
यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३२७४ इतकी झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात आज ५३३ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांची संख्या आता ५८६६ इतकी झाली. रूग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ६३.४८ टक्के इतकी आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये दुपारपर्यंत १५ रुग्ण बाधित आढळून आले. बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये पारनेर ०१, मनपा ०९, कॅन्टोन्मेंट ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे. त्यानंतर, आणखी २४ रूग्ण बाधित आढळून आले.
यामध्ये, मनपा ०६, नगर ग्रामीण ०२- जेऊर ०१, घोसपुरी ०१, कोपरगाव ०१, जामखेड ०१, कँटोन्मेंट ०१, श्रीरामपुर ०६ ,नेवासा ०१, पारनेर ०६ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज ३११ जण बाधित आढळुन आले. यामध्ये,मनपा ५५, संगमनेर १५, राहाता १२, पाथर्डी ५५, नगर ग्रामीण ०७, श्रीरामपुर २३, कॅन्टोन्मेंट १५, नेवासा ०४, श्रीगोंदा १९, पारनेर १२, अकोले १९, राहुरी १६, शेवगाव ०६, कोपरगाव १८, जामखेड ०५ आणि कर्जत ३० अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या २९६ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा २२६, संगमनेर ०३, राहाता ०३, पाथर्डी ०३, नगर ग्रामीण १५, श्रीरामपूर ०४, कॅन्टोन्मेंट ०८, नेवासा ०४, श्रीगोंदा ०३, पारनेर १२, अकोले ०१, राहुरी ०४, शेवगाव ०१, कर्जत ०८आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज एकूण ५३३ रुग्णांना घरी सोडण्यात आले. यामध्ये, मनपा १७७, संगमनेर ३५, राहाता १०, पाथर्डी ३२, नगर ग्रा.२२, श्रीरामपूर १३, कॅन्टोन्मेंट १३, नेवासा २०, श्रीगोंदा ६०, पारनेर ३२, अकोले ११, राहुरी ७, शेवगाव ४४, कोपरगाव १३, जामखेड २६, कर्जत ४, मिलिटरी हॉस्पीटल १३, इतर जिल्हा ०१.
- बरे झालेले एकूण रुग्ण:५८६६
- उपचार सुरू असलेले रूग्ण:३२७४
- मृत्यू:१००
- एकूण रूग्ण संख्या:९२४०
(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved