केडगाव हत्याकांडप्रकरणी आ. जगताप व आ. कर्डिले यांच्यावर कारवाई करण्याची मागणी

Ahmednagarlive24
Published:

नगर : केडगाव हत्याकांड दरम्यान संदीप कोतकरला मोबाईल फोन वापरू दिल्याप्रकरणी संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबनाला सामोरे जावे लागले.

पण त्याच्याशी आ. संग्राम जगताप व आ. शिवाजीराव कर्डिले या दोघांनीही मोबाईलवरुन संपर्क साधल्याचे स्पष्ट झालेले आहे तर मग या आमदारांवर निलंबनाची कारवाई का झाली नाही असा सवाल मयत वसंत ठुबे यांचे बंधू प्रमोद ठुबे यांनी विचारला आहे.

यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे . ७ एप्रिल २०१८ रोजी केडगाव येथे वसंत आनंदा ठुबे व संजय कोतकर यांची निघृण हत्याकांड हत्या करण्यात आली होती.

हे दोन्ही शिवसेना पक्षाचे सदस्य व पदाधिकारी होते , एका खून प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या कुख्यात कैद्यांसमवेत दोन्ही आमदार संपर्क कसा साधतात असा प्रश्न ठुबे यांनी विचारला आहे . जर पोलीस कर्मचारी निलंबित होत असतील तर आमदारांना का निलंबित केले जाऊ नये ?

आमदार जगताप आणि त्यांचे सासरे आमदार कर्डीले हे देखील या प्रकरणात त्यांच्या वर योग्य ती कारवाई करा अशी मागणी ठुबे यांनी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment