अहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :-कोपरगाव शहर कोपरगाव येथे रविवारी दुपारपर्यंत करण्यात आलेल्या ३४ रॅपिड अँटीजेन टेस्टमध्ये ४ जणांचे अहवाल बाधित,
तर २५ रुग्णांना आज बरे होऊन घरी सोडण्यात आल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली.

रविवारी ३४ रॅपिड टेस्ट केल्या. त्यापैकी ४ बाधित झाले. त्यात पढेगाव येथील ६० वर्षीय पुरुष, अंचलगाव येथील ४६ वर्षीय पुरुष, इंदिरा पथ येथील २९ वर्षीय पुरुष, जानकी विश्व येथील ६४ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
दरम्यान, नगारिकांनी घराबाहेर पडू नये. घराबाहेर पडल्यास मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा. वाढती रुग्णसंख्या पाहता
आता नागरिकांनी सजग राहून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी खबरदारी घेण्याची गरज आहे. तरच कोरोनाच्या विळख्यातून आपण बाहेर पडू, असे वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी सांगितले.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved