अहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :-राहुरी तालुक्यात रविवारी चौथ्या कोरोना बाधित रुग्णाचा बळी गेला असून विळद घाट येथील रुग्णालयात शनिवारी बाधित अाढळलेल्या कात्रड येथील ७५ वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाला.
कोरोना बाधित रुग्णांनी दीड शतक पूर्ण केले असून रविवारी पुन्हा नवे दहा रुग्ण आढळले. यात बारागाव नांदूर येथे ८ जण असून यात ३ पुरुष व ५ महिला, तर गुहा येथे १ महिला, बोधेगावात १ जण यांचा समावेश आहे.
सर्व बाधित रॅपिड अँटीजेन टेस्टमध्ये आढळले. यापूर्वी देवळाली प्रवरा, राहुरी येथील तीन बाधित रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला.
गेल्या दीड महिन्यात राहुरी तालुक्यात १६२ कोरोना बाधित रुग्ण आढळले. त्यातील एकूण ८९ बरे झाले. एकूण ६९ जणांवर उपचार सुरू आहेत.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved