‘ह्या’ ठिकाणी आजपासून जोरदार पावसाची शक्यता

Published on -

अहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :- मान्सूनने सध्या राज्यात सर्वदूर हजेरी लावली आहे. मागील काही दिवस सातत्याने कोसळणारा पाऊस दोन दिवसांपासून उघडला आहे.

परंतु आता पुन्हा सोमवारपासून कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात जोरदार पाऊस होऊ शकतो असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होण्याची शक्यता असल्याने हा बदल होऊ शकतो. राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पडल्यानंतर आता काही प्रमाणात जोर ओसरला आहे.

कोकणसह, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात अनेक ठिकाणी दिवसभर ऊन पडले होते. कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचे धुवादार कोसळल्यानंतर आता पावसाचे प्रमाण कमी झाले आहे.

मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक जिल्ह्यांतील बहुतांश भागात जोरदार पाऊस पडला. बंगालच्या उपसागरात

कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होण्याची शक्यता आहे. सोमवारपासून पुन्हा कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!