अहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :- कर्नाटक सरकार व सीमाभागातील मराठी माणूस यांतील द्वेष अनेक माध्यमातून अनेकदा समोर आला आहे. याचं आणखी एक संतापजनक उदाहरण समोर आलं.
बेळगाव जिल्ह्यातील एका गावात तेथील नागरिकांनी बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कर्नाटक सरकारच्या आदेशावरून रातोरात हटवण्यात आला आहे.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2020/06/Ahmednagar-breaking-news-marathi.jpg)
या घटनेमुळे शिवभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. राहाता शहरात या घटनेच्या निषेधार्थ रविवारी शिवसेनेचे नेते, पालिकेचे उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे
यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी कर्नाटकाचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला बांगड्यांचा हार घालून पुतळा दहन केले.
यावेळी येडियुरप्पा सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना नेते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या पुढील आदेशाने तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल, असा इशारा यावेळी उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे यांनी दिला.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved