अहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :- दिवसेंदिवस कोरोनाचे संकट वाढतच चालले आहे. सकारात्मक दृष्टीकोनातून यावर मात करणे सहज शक्य आहे. अशा वेळी अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने हाती घेण्यात आलेला मिशन पॉझिटिव्ह सोच हा उपक्रम स्तुत्य असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित दादा तांबे यांनी केली आहे.
ते स्वतः या उपक्रमामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून सहभागी झाले होते. यावेळी नगरकरांशी संवाद साधताना ते बोलत होते, नगरकरांना संबोधित करताना तांबे म्हणाले की, नोव्हेंबर महिन्यात कोरोनाची जगातील सगळ्यात पहिली केस चीनमध्ये सापडली होती. त्यानंतर भारता मधील कोरोनाचा पहिला रुग्ण जानेवारी महिन्यामध्ये आढळून आला होता.
परंतु जानेवारीपासून ते २३ मार्च पर्यंतचा काळ हा देशात असाच सुरू होता. त्यानंतर आपल्याकडे लॉकडाऊन करण्या संदर्भातील निर्णय घेण्यात आला. त्यामुळे सुरुवातीच्या काळात या संकटाचे गांभीर्य आपल्या लक्षातच आले नाही.
आज आपल्या घरापर्यंत कोरोना येऊन पोहोचला आहे. आपल्या कुटुंबातील तसेच नातेवाईक, मित्र परिवारा मधील अनेक लोक कोरोनामुळे जात आहेत. नगर शहरात तर अत्यंत नावाजलेले, मोठे लोक कोरोनाचे बळी ठरले आहेत. यामुळे निश्चितच हे मोठे संकट आहे. या संकटाच्या काळामध्ये आपण स्वतःची तसेच आपल्या परिवाराची काळजी घेणे आवश्यक आहे. परंतु हे करत असताना कोणत्याही प्रकारे घाबरून जाण्याची आवश्यकता नाही, असे यावेळी बोलताना तांबे म्हणाले.
तांबे पुढे म्हणाले की, अशा काळामध्ये आपण आपले विचार सकारात्मक ठेवले पाहिजेत. त्यासाठीच शहर काँग्रेसच्या वतीने मिशन पॉझिटिव्ह सोच हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आपले पूर्वज आपल्याला कायम सांगत आलेले आहेत की, कुठलही संकट आलं तर अशा वेळी आपण सकारात्मक राहिल पाहिजे. तुमची मानसिकता सकारात्मक असेल तर संकटाची दोन हात करणे हे आपल्याला सहज शक्य होतं.
कोरोनामुळे अनेक लोकांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. अनेक व्यापाऱ्यांचे व्यापार पूर्णपणे उध्वस्त झाले आहेत. परंतु असे असले तरी देखील आपण सकारात्मक राहिलो तर निश्चितच आपण यातून देखील मार्ग काढू शकतो. त्यामुळे अशा नकारात्मक वातावरणामध्ये एक सकारात्मक कार्यक्रम राबवण्याचा अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसचा मिशन पॉझिटिव्ह सोच उपक्रम कौतुकास्पद आहे.
सत्यजित तांबे यांनी नगर शहरातील नागरिकांनी या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. या उपक्रमाला नगरकरांच्या समोर घेऊन येणारे किरण काळे यांचं तांबे यांनी यावेळी बोलताना विशेष अभिनंदन केले आहे. त्याचबरोबर शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण, युवक शहर जिल्हाध्यक्ष मयूर पाटोळे आणि युवक काँग्रेसच्या टीमचे देखील त्यांनी अभिनंदन कले.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved