मोठी बातमी :शिर्डीच्या साईबाबा संस्थानचे नवे सीईओ के. एच. बगाटे !

Published on -

अहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :-  राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या ट्रान्स्फर करण्यात आल्या आहेत. ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर, औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्यासह पाच प्रशासकीय अधिकाऱ्यांची बदली झाली आहे.

रत्नागिरी जिल्हा परिषदेचे सीईओ के. एच. बगाटे यांची शिर्डीतील साईबाबा संस्थान ट्रस्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदी नेमणूक करण्यात आली आहे. डिसेंबर महिन्यातच त्यांची रत्नागिरीत बदली झाली होती.

‘म्हाडा’चे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर, औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्यासह पाच प्रशासकीय अधिकार्‍यांची बदली झाली आहे. राज्य सरकारनं पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.

यात मुंबई म्हाडाच्या उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर यांची वन विभागाच्या प्रधान सचिवपदी बदली करण्यात आली आहे.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव संजय खंदारे यांची महाजेनकोच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

तर औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांची मुख्य सचिवांच्या कार्यालयात उप सचिवपदी बदली करण्यात आली आहे.

जलस्वराज्य प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक ए.ए.गुल्हाणे यांची चंद्रपूरच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. शिर्डी येथील साई संस्थानच्या सीईओपदी सरकारकडून के.एच. बगाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News