अबब! ‘ह्या’ तालुक्याची कोरोनाची हजारी पार; नव्याने 22 रुग्ण

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,11 ऑगस्ट 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण अति प्रमाणात वाढत चालले आहेत. संगमनेरमध्ये जणू कोरोनाचा विस्फोटचं झाला आहे. इतर तालुक्यांच्या तुलनेत संगमनेरमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत. काल नव्याने २२ रुग्ण आढळून आले आहेत.

त्यामुळे आता तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 1024 झाली आहे. सध्या  204 व्यक्तींवर उपचार सुरू असल्याची माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दिली.

काल पॉजिटीव्ह आलेल्या २२ रुग्णांमध्ये सुकेवाडी येथील 74 वर्षीय पुरुष, संगमनेरातील वकील कॉलनी येथील 45 वर्षीय पुरुष, मोगलपुरा येथील 33 वर्षीय पुरुष,

अभंगमळा येथील 74 वर्षीय महिला, पिंपरणे येथील 50 वर्षीय पुरुष, संगमनेरातील साळीवाडा येथील 45 वर्षीय महिला, 60 वर्षीय महिला, 3 वर्षीय बालिका, 35 वर्षीय पुरुष, वडगावपान येथील 55 वर्षीय पुरुष, विद्यानगर येथील 52 वर्षीय पुरुष,

मालदाड रोड येथील 26 वर्षीय पुरुष, मोगलपुरा येथील 34 वर्षीय महिला, जनतानगर येथील 27 वर्षीय पुरुष, ढोलेवाडी येथील 40 वर्षीय पुरुष,

परदेशपुरा येथील 61 वर्षीय पुरुष 35 वर्षीय महिला, 16 वर्षीय मुलगा, 9 वर्षीय मुलगी, 16 वर्षीय मुलगी, 14 वर्षीय मुलगी, वेल्हाळे येथील 65 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

प्रशासनाने सर्वोतपरी काळजी घेण्याचे आणि उपाययोजना करण्याचे काम सुरु असून नागरिकांनीही सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment