कोपरगावात नव्याने आढळले ‘इतके’ कोरोना रुग्ण

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,11 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमणाचे प्रमाण वाढत चालले आहे. दहा हजारांचा आकडा रुग्णसंख्येने पार केला आहे. ग्रामीण भागांत कोरोनाने शिरकाव केल्यानंतर हे प्रमाण जास्त वाढले.

याला कोपरगाव तालुकाही याला अपवाद राहिलेला नाही. मागील काही आठवड्यांपासून कोपरगाव तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. आता नव्याने पुन्हा सोमवारी 8 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

हे रुग्ण 9 ऑगस्ट रोजी सापडलेल्या 6 कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील आहेत. दरम्यान सोमवारी 21 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसुंदर यांनी दिली.

काल आढळलेल्या ८ रुग्णांमध्ये कोपरगाव शहरातील ब्रिजलाल नगर येथील 34 वर्षीय पुरुष, इंदिरा पथ येथील 48 वर्षीय महिला, गांधीनगर मधील 20 वर्षीय युवक, तालुक्यातील अंचलगाव येथील 18 व 20 वर्षीय युवक तर 50 वर्षीय महिला,

पोहेगाव येथील 25 वर्षीय युवक, झगडे फाटा येथील 19 वर्षीय महिला आदींचा समावेश आहे. तालुक्यात 342 रुग्ण पॉझिटिव्ह झालेले असून 156 रुग्ण सध्या उपचार घेत आहेत.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment