प्रसिद्ध शायर राहत इंदौरी यांचे कोरोनामुळे निधन

Published on -

अहमदनगर Live24 टीम,11 ऑगस्ट 2020 :- राहत इंदौरी यांचे कोरोनामुळे निधन झाले. ऑरबिंदो हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोरोनाची लागण झाल्याचं ट्विटवरून सांगितलं होतं. 

प्रख्यात गझलकार आणि कवी-गीतकार राहत इंदौरी यांना कोरोनाची लागण झाली होती, मध्य प्रदेशातील इंदौरमधल्या रुग्णालयात काल रात्री उशिरा त्यांना दाखल करण्यात आले होते.

ट्विटरनंतर आणखी एक विनंती राहत इंदौरी यांनी केली होती. माझ्या तब्येतीची माहिती ट्विटर किंवा फेसबुकवरून देईन. मला किंवा घरी फोन करू नका.

राहत इंदौरी हे प्रसिद्ध शायर होते, याशिवाय त्यांनी बॉलिवूडसाठीही अनेक गाणी लिहिली आहेत. इश्क, मिशन काश्मीर, मुन्नाभाई एमबीबीएस, मर्डर अशा अनेक चित्रपटांची गाणी राहत इंदौरी यांनी लिहिली आहेत.

आज हमने दिल का हर किस्सा (सर), चोरी चोरी जब नजरे मिली (करीब), ये रिश्ता क्या कहलता है (मीनाक्षी), धुआ धुआ (मिशन काश्मीर),

दिल को हजार बार (मर्डर) अशी अनेक अर्थपूर्ण गाणी त्यांच्या लेखणीतून उतरली आहेत. ऋत, मौजूद, नाराज अशा पुस्तकांचे लेखनही त्यांनी केले आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News