बिग ब्रेकिंग : संजय दत्तला फुफ्फुसाच्या कर्करोगाची लागण

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,11 ऑगस्ट 2020 :-काही दिवसांपूर्वी अभिनेते संजय दत्त यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची बातमी समोर आली होती. श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं त्याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. पण आता एक वाईट बातमी समोर आली आहे.

बॉलीवूड अभिनेता संजय दत्त याला फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. याच्या उपचारासाठी संजय दत्त अमेरिकेला रवाना झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

संजय दत्तला ३ स्टेजचा कर्करोग झाला आहे. फिल्म एनालिटिक्स कोमल नहाटा यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. आज दुपारीच संजय दत्त याने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण कामातून ब्रेक घेत असल्याचे सांगितले होते. याचे कारण आता चाहत्यांच्या समोर येत आहेत.

काही दिवसांपूर्वीच संजय दत्तला श्वसनाचा त्रास जाणवत असल्यामुळे मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याठिकाणी त्यांची कोरोना टेस्टही करण्यात आली होती. त्याचा अहवाल निगेटिव्ह आला होता.

दरम्यान आज आज संजय दत्त याने ट्विट केले होते. यामध्ये त्याने म्हटले होते की, मित्रांनो काही वैद्यकीय उपचारांसाठी सध्या मी नेहमीच्या कामातून लहानशी सुट्टी घेत आहे. कुटुंबीय आणि मित्रपरिवार माझ्यासोबत आहेत. त्यामुळे उलटसुलट चर्चांवर विश्वास ठेवून चिंतेत पडू नका, एवढेच माझे हितचिंतकांना सांगणे आहे. तुमचे प्रेम आणि सदिच्छांमुळे मी लवकरच परतेन, असे संजय दत्तने या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment