अहमदनगर Live24 टीम,12 ऑगस्ट 2020 :- नगर शहराचे लाडके आमदार म्हणून लौकिक असलेले अनिल राठोड यांच्याकडे साखर कारखाना िकंवा शैक्षणिक संस्था नव्हती, तरी ते लोकनेते होते. सर्वसामान्यांसाठी ते सतत धावून जात होते,
अशा शब्दांत शहर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना उपनेते स्व. राठोड यांना श्रद्धांजली अर्पण केली. शहर भाजपच्या वतीने शिवसेनेचे उपनेते स्व. अनिल राठोड यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दादा चौधरी विद्यालयात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, महापौर बाबासाहेब वाकळे, सुनील रामदासी, वसंत लोढा, अॅड. विवेक नाईक, नरेंद्र कुलकर्णी, नगरसेवक रवींद्र बारस्कर, तुषार पोटे, महेश तवले, सचिन पारखी आदी उपस्थित होते महापौर वाकळे म्हणाले, मोबाइल आमदार म्हणून ते प्रसिद्ध होते. त्यांच्या पासून शिकवण घेत पुढे काम करू.
भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष गंधे म्हणाले, स्व. राठाेड हे जनसामान्यांचे नेते होते. अल्पसंख्याक समाजाचे असतानाही त्यांनी शहराचे नेतृत्व केले. भाजपशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. भाजपातील अनेक नेत्यांशी त्यांचे तात्विक वाद होत असत, मात्र प्रत्येक निवडणुकीत भाजपच्या सर्व नेत्यांनी अनिलभैय्यांचेच काम केले.
आज अनिलभय्या आपल्यात नसले तरी भविष्यात भाजपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांना अपेक्षित असलेलेच जनतेचे काम करतील. लोढा म्हणाले, ४० वर्ष अनिलभैय्यांनी आपला कामाचा ठसा उमटवला. कायम युती धर्म पाळणारे. भाजपचा म्हणून माझे अनेकवेळा त्यांच्याशी मतभेद झाले.
तसेच दिलीप गांधी, सुनील रामदासी, अभय आगरकर, प्रभाकर दसरे यांच्याशी काही ताित्त्वक बाबींवर मतभेद झाले. तरीही युती धर्म पाळत त्यांच्या विजयासाठी भाजपने कायम संघर्ष करत खांद्याला खांदा लाऊन लढलो. त्यामुळे पाच निवडणुकीत त्यांना विजय मिळाला. आता त्यांच्या पश्च्यात त्यांचा वारसा पुढे चालवण्याचे काम भाजप करेल.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved