अहमदनगर Live24 टीम,12 ऑगस्ट 2020 :- पारनेर मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके हे आपल्या उपक्रमशील स्वभावाने परिचित आहेत. कोरोना विषाणूचा प्रसार जसा तालुक्यात व्हायला लागला तसा त्यांनी आपल्या मदतीचा ओघही वाढवला.
आता त्यांच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून टाकळी ढोकेश्वर येथील राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात १ हजार बेडचे सुसज्ज अद्ययावत कोव्हिड केअर सेंटर उभे करण्यात येणार आहे.
स्वखर्चातून उभे राहणारे अशाप्रकारचे हे राज्यातील पहिलेच कोव्हिड सेंटर ठरणार आहे. लंके यांनी या सेंटरला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव दिले आहे.
प्रतिष्ठानतर्फे तालुक्यातील एक हजार कोरोना रुग्णांचे पालकत्व घेण्याची घोषणाही लंके यांनी केली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे हे या कोव्हिड सेंटरचे उदघाटन करणार आहेत.
पवार यांच्या नावाने सुरू केलेल्या या कोव्हिड सेंटरमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांसाठी गरम पाणी, दूध, अंडी, चहा, दोन वेळचे जेवण मोफत देण्यात येणार आहे.
रुग्णांच्या करमणुकीसाठीही सोय करण्यात येत आहे. राज्यातील आदर्श कोव्हिड सेंटर ठरणार असल्याने त्याला पवारांचे नाव देण्यात आले असल्याचे आ. लंके यांनी सांगितले.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved