राष्ट्रवादीत भूकंप : पार्थ पवार मोठा निर्णय घेणार ?

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :- पार्थ अपरिपक्व आहे. त्याच्या मागणीला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही,’ असं म्हणत शरद पवार यांनी पार्थ यांना फटकारलं. शऱद पवार यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे सर्वांचे डोळे विस्फारले.

या टीकेनंतर पार्थ पवार मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पार्थ पवार पक्ष सोडणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.

पार्थ पवार यांच्याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या विधानानंतर पार्थ पवार कमालीचे अस्वस्थ असून काही मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे.

असा दावा पार्थ पवार समर्थकांकडून केला जातोय. सध्याची राजकीय स्थिती बघता निर्णय घेण्याची ही योग्य योग्य वेळ असल्याचं देखील बोललं जातं आहे.

शरद पवारांनी जाहीरपणे फटकारल्यानंतर पार्थ यांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसल्याचं त्यांच्या समर्थकांना वाटतं. पार्थ पवार काहीतरी मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

पार्थ पवार प्रसारमाध्यमांसमोर अपमान झाला म्हणून पक्ष सोडण्याचा निर्णय घेऊ शकतात, असं मत काही राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. पदवीधर मतदारसंघात पार्थ पवार यांना उमेदवारी द्यावी, असा आग्रह अजित पवार यांचा होता.

पण त्यालादेखील शरद पवार यांनी विरोध केला. पदवीधर मतदारसंघात पार्थ पवार यांना उमेदवारी देता येणार नाही, ही भूमिका शरद पवार यांनी घेतली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या घडामोडींमुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघालं आहे.

पार्थ पवार कोणताही निर्णय आपल्या वडिलांना विचारल्याशिवाय घेऊ शकत नाही. दुसरीकडे राणे कुटुंबाने पार्थ पवार यांची पाठराखण केली आहे. त्यामुळे भाजपकडून ऑपरेशन लोटस हे महाराष्ट्रात सक्रीय झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment