पारनेर ;- राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा उफाळली असून, त्याचाच परिपाक म्हणजे बाजार समितीच्या नऊ संचालकांचे सामूहिक राजीनामे होय.
हे राजीनामा धक्कातंत्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर होत असल्याने राष्ट्रवादीला आगामी विधानसभा निवडणुकीत पारनेर तालुक्यात संघर्ष करावा लागेल.
झावरे गटातील बाजार समितीच्या उपसभापतिंसह नऊ संचालकांच्या राजीनाम्यामुळे झावरे हे इतर पर्यायांच्या शोधात असल्याची चर्चा असून, तालुक्यात राजकीय भूकंप करतील का, असा प्रश्न निर्माण होत आहे.
विधानसभा निवडणुकीला काही दिवस शिल्लक राहिले असताना पारनेर बाजार समितीतील राजीनामानाट्याने राष्ट्रवादीतील खदखद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणली.
याचा परिणाम विधानसभा निवडणुकीत तालुक्याच्या राजकारणामध्ये दिसणार आहे, हे निश्चित. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांच्यावर विश्वास ठराव दाखल करण्यात आला होता.
तो बारगळला. त्यानंतर गायकवाड यांचे सह्यांचे अधिकार देखील काढून घेण्यात आले होते. त्यादरमानच्या घडामोडी सर्वश्रुत आहेतच.
- केंद्र सरकारची आठव्या वेतन आयोग स्थापनेला मंजुरी ; पगारात काय फरक पडेल ?
- 8th Pay Commission Breaking : एक कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांना लाभ; 2026 पासून होणार लागू
- 8th Pay Commission : कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला केंद्राची मंजुरी
- माणसाचे गीत गाणारे – डॉ. सुधीर तांबे
- लोकसर्जन – मा.आ.डॉ सुधीर तांबे.