अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :- संगमनेर तालुक्यातील मुंजेवाडी अकलापूर परिसरात एका तरुणाने प्रेमविवाह केला म्हणून त्याच्या घराचा दरवाजा तोडून मुलीच्या मामाने प्रियकराच्या घरातील महिलेस मारहाण केली.
ही घटना बुधवार दि. 12 ऑगस्ट रोजी 8 वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यात दत्तात्रय भिकाजी निमसे व भागाजी निमसे (रा. येलखोप, ता. संगमनेर) असे दोघांना आरोपी करण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मुंजेवाडी येथे राहणार्या अजितने आळेफाटा येथे एका कॉलेजला शिकणार्या मुलीसोबत प्रेम केले होते. त्यांनी एकमेकांसोबत लग्न करण्याचा निर्णय देखील घेतला होता.
मात्र, या निर्णयास दोन्ही घरच्यांचा नकार होता. कालांतराने अजितचे कुटुंब मान्य झाले. मात्र, मुलीचे कुटुंब या विवाहास राजी नव्हते. परिणामी या दोघांनी पुणे तालुक्यात त्यांच्या पद्धतीने हा विवाह अटपून घेतला.
या दोघांची मने जुळली, मात्र दोन कौटुंबिक नाते जुळली नाही. त्यामुळे त्यांच्या मनातील दरी अधिक खोल होत गेली. त्यामुळे,
मुलीच्या मामांना या प्रकाराचा राग होताच त्यांनी थेट मुलाच्या घरी जाऊन दरवाजा तोडून घरात प्रवेश केला आणि अंजाबाई काशिद यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली.
तर तुमच्या मुलगा कोठे आहे? त्यास आम्ही ठार मारु असे म्हणत ते निघून गेले. याप्रकरणी उपरोक्त दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved