श्रीगोंद्यात अल्पवयीन मुलीचे अपहरण; दोन दिवसात आरोपी पकडला

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :- श्रीगोंदा तालुक्यातील एका गावातून ९ ऑगस्ट रोजी एका अल्पवयीन मुलीचे तिच्या घरातून अपहरण झाले होते. तिच्या नातेवाईकांनी शोधाशोध घेऊनही मुलगी न सापडली नाही.

त्यानंतर मुलीच्या वडिलांनी मुलीच्या अपहरणाची पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानंतर अपहरण करणाऱ्या मुलास पोलिसांनी दोन दिवसात पकडले.

श्रीगोंदा पोलिसांनी कसून चौकशी केली असता तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या मुलीचा नातेवाईक असणाऱ्या तरुणाने तिचे अपहरण केले होते. त्या दिवशी तो मुलीच्या घरी आल्याची पोलिसांना माहिती मिळाली.

त्यामुळे श्रीगोंदा पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी संबंधित संशयित तरुणाचे मोबाईल टॉवर लोकेशन मागवले. त्यानंतर हा तरुण बीड जिल्ह्यातील एका गावात असल्याचे समजले.

पोलिसांनी त्याचा शोध घेऊन प्रथम मुलीची सुटका केली. यानंतर पोलिसांनी त्यास अटक केली आहे. अल्पवयीन मुलीचे अपहरण करून

तिच्यावर शारिरीक अत्याचार केल्या प्रकरणी पोलिसांनी त्या तरुणाविरुद्ध अत्याचार प्रतिबंधक (पोक्सो) कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment