कर्जत – तालुक्यातील 21 गावांसाठी संजीवनी देणाऱ्या तुकाई चारी योजनेसाठी 100 दशलक्ष घनफूट पाणी मंजूर केले. अनेक पिढ्यांच्या स्वप्नपूर्तीच्या दृष्टीने तुकाईचारीचा अनेक वर्षांचा प्रश्न मंत्रिपदाच्या माध्यमातून सोडविला. विविध विकासकामांसाठी भरभरून निधी, विविध योजना आणि खात्यांमधून आणण्याचे काम सातत्याने केले.
यापुढेही मतदारसंघातील प्रत्येक गावाचा विकास करणारच आहे. शेवटी आपल्यातला तो आपलाच अन परका तो परकाच एवढं मात्र खरं असे म्हणत पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी रोहित पवार यांना अप्रत्यक्ष टोला लगावला. कर्जत तालुक्यातील चांदे खुर्द येथे वालवड- चांदे खुर्द ते गुरवपिंप्री रस्ता डांबरीकरण कामाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
शिंदे पुढे म्हणाले, ज्या परिस्थितीत मी माझं आयुष्य जगलो आहे, ते आयुष्य माझ्या मतदाराच्या वाटेला येऊ नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मी माझ्या मतदारांना अभिमान वाटेल असे कार्य जलसंधारण खात्याच्या माध्यमातून केले आहे. कारखानदारी- उद्योग, शैक्षणिक संस्था सुरू करण्याचा स्वार्थी विचार कधी मनाला शिवला नसल्याचे ते म्हणाले.
- प्रतिक्षा संपली ! ‘या’ मुहूर्ताच्या आधीच लाडक्या बहिणींना मिळणार पुढचा हफ्ता, वाचा सविस्तर
- मुंबई ते नवी मुंबई प्रवास होणार वेगवान ! मेट्रोच्या आणखी एका मार्गाला मंजुरी, कसा असणार रूट?
- ब्रेकिंग: पुणे अहिल्यानगर मार्गावर ५४ किलोमीटरचा उड्डाणपूल अन् मेट्रो मार्ग तयार होणार, कसा असणार संपूर्ण प्रकल्प?
- लाडक्या बहिणींना लवकरच मिळणार Good News ! ७ दिवसात मिळणार पुढील हफ्ता, १५०० मिळणार की ३००० ?
- राज्यातील शिक्षकांना सक्तीची सेवानिवृत्ती टाळण्यासाठी कितीवेळा TET परीक्षा देता येणार? समोर आली मोठी अपडेट













