शेवगाव – येथील इंदिरानगर भागातील हनुमान मंदिराच्या आडोशाला जुगार खेळणाऱ्याकडून 16 हजार 110 रुपयांची रक्कम, 85 हजार रुपयांच्या तीन दुचाक्या व साहित्य असा एकुण एक लाख एक हजार 110 रुपयांचा माल हस्तगत केला आहे. ही कारवाई गुन्हे अन्वेषण विभागाने सोमवारी रात्री उशिरा केली.
याबाबत गुन्हे अन्वेषण विभागाचे पो.कॉं. प्रकाश वाघ यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुप्त खबऱ्याच्या माहितीवरून इंदिरानगर भागात छापा टाकला असता हनुमान मंदिराच्या आडोशाला अर्षद अल्ताफ इनामदार (वय- 19),
संतोष रामचंद्र गांगे (वय-27,) मोहीत ईब्राहीम शेख (वय-30), जावेद हबीब शेख (वय-22), गणेश प्रल्हाद गांगे (वय-31), हुसेन रहीम बेग (वय- 25), साहील अजीज शेख (वय-18), अल्ताफ हारुण बेग (वय-19),सतीष अशोक गुणवंत (वय-24), संतोष मच्छिंद्र वाघमारे (वय-30), हकीम मुनीर बेग (वय-38), रवि संजय रमंडवाल (वय-23),
अमोल सिताराम नांगरे (वय-34 सर्व राहणार इंदिरा नगर शेवगाव) व संदीप पांडुरंग बनसोडे (वय-26 रा.कर्डीले वस्ती शेवगाव) यांना तिरट नावाचा हारजीतचा जुगार पैशावर खेळतांना आढळून आले.
त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. पंचासमक्ष त्यांच्याकडून रोख रक्कम दुचाक्या व खेळाचे साहित्य हस्तगत केले.पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉं. वाघ, बाळासाहेब मुळीक, रोहीदास नवगिरे, शिवाजी ढाकणे, रणजीत जाधव आदींच्या पथकाने केली.
- 8 वा वेतन आयोग : शिपाई, शिक्षक, ते आयएएस अधिकारी कोणाला किती मिळणार पगार ?
- 8th Pay Commission : 10 वर्षांची प्रतीक्षा संपली ! सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार इतकी वाढ
- दुसऱ्याच्या कर्जाला गॅरेंटर बनण्याआधी दहा वेळा विचार करा! नाहीतर येईल कपाळाला हात मारण्याची वेळ
- Supreme Court Bharti 2025: भारतीय सर्वोच्च न्यायालयात 90 रिक्त जागांसाठी भरती सुरू; करा
- एसबीआयच्या ‘या’ म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूक करा आणि कोटीत परतावा मिळवा ‘