शिर्डी-मुंबई गाडी लवकरच सुरू होणार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,17 ऑगस्ट 2020 :-मध्य रेल्वेच्या नवीन वेळापत्रकामध्ये सध्याची अत्यल्प बोग्या असलेली साईनगर शिर्डी-दौंड, पुणे, मुंबई जलद पॅसेंजर १९ बोगीची करण्यात येईल, असे आश्वासन सोलापूर विभागाचे मुख्य प्रबंधक शैलेश गुप्ता यांनी दिले.

त्यामुळे छोटी गाडी आता मोठी होणार आहे. १३ ऑगस्ट रोजी सोलापूर विभाग मध्य रेल्वे सल्लागार समितीची मुख्य प्रबंधक शैलेश गुप्ता यांच्या समवेत बैठक झाली.

यावेळी रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य व प्रवासी संघटनेचे अध्यक्ष रणजित श्रीगोड, विशाल फोपळे, वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक प्रदीप हिरडे, रेल्वे मंडल सहप्रबंधक व्ही. के. नागर व वरिष्ठ मंडल परिचालन प्रबंधक प्रतीक वंजारे आदी उपस्थित होते.

त्यांनी साईनगर ते मुंबई जलद पॅसेंजर ही गाडी १९ बोगीची स्वतंत्र सुरू करण्याची मागणी बैठकीत केली. सध्या ही गाडी कमी डब्यांची आहे. मुंबईहून दौंडपर्यंत विजापूर व पंढरपूर येथे जाणाऱ्या काही बोग्या याच गाडीला जोडल्या जातात.

दोन जनरल, दोन आरक्षित व एक वातानुकूलित व गार्ड अशा बोग्या असणारी ही गाडी पुढे शिर्डीला येते. त्यामुळे प्रवाशांना ही गाडी अपूर्ण पडत होती.

नवीन वेळापत्रकामध्ये या स्वतंत्र गाडीचा समावेश करून दौंड बायपास मार्गे पुण्याला जाईल, अशी ग्वाही मुख्य प्रबंधक गुप्ता यांनी दिली. या गाडीमुळे प्रवासाचा वेळ वाचणार आहे

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment