अहमदनगर Live24 टीम,17 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी अधिकाधिक कोव्हीड सेंटर सुरु करण्यावर शासनाचा भर आहे.
बाधित रुग्णांना लवकर आरोग्य सुविधा देण्याला प्राधान्य आहे. नुकतेच शनिशिंगणापूर येथे कोव्हीड सेंटर सुरु करण्यात आले आहे.
राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी तालुक्यातील शनिशिंगणापूर येथे सुरू करण्यात आलेल्या कोव्हिड केअर सेंटरला भेट देऊन पाहणी केली. काळजी करू नका, लवकर बरे व्हाल असा दिलासाही त्यांनी रुग्णांना दिला.
शनिशिंगणापूर कोविड केअर सेंटर मधील करोना रुग्णांची संख्या, त्यांना देण्यात येणार्या सेवा-सुविधा व औषधोपचार याबाबद माहिती घेऊन करोना रुग्णांशी संवाद साधला.
रुग्णांच्या तब्येतीची चौकशी करून काळजी करू नका, तुम्ही लवकर बरे होऊन घरी जाल असा धीर दिला. यावेळी त्यांनी अधिकारी वर्गांची आढावा बैठक घेतली.
तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिराज सूर्यवंशी, सोनईचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कसबे, शनिशिंगणापूर देवस्थानचे अधिकारी व डॉक्टर यावेळी उपस्थित होते.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved