व्याजाच्या पैशासाठी लाथाबुक्क्याने मारहाण करून, पळवून नेवून धमकी

Ahmednagarlive24
Published:

नगर  – नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील जवळा येथे राहणारे शेतकरी प्रशांत मारुती शिंदे, वय ३४ यांनी आरोपी जगदाळे यांच्याकडून घेतलेल्या पैशावरील व्याजाच्या पैशाच्या कारणावरुन आरोपींनी प्रशांत शिंदे या शेतकऱ्यास बोलावून घेतले.

शिवीगाळ करत लाथाबुक्क्याने मारहाण करून धमकी देवून दुचाकीवर बसवून पळवून नेले.

शेतकऱ्याच्या खिशातील ५ हजार रुपये बळजबरीने काढून घेतले व जिवे ठार मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी प्रशांत शिंदे या शेतकऱ्याने जामखेड पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन आरोपी अमोल बापूराव जगदाळे, रा. आपटी, जामखेड व त्याचे दोन अनोळखी साथीदार अशा तिघांविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला असून पोनि पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि कांबळे हे पढील तपास करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment