अहमदनगर Live24 टीम,18 ऑगस्ट 2020 :- पारनेर तालुक्यातील सुप्या जवळील वाघुंडे शिवारातील एका आदिवासी समाजातील महिलेवर काही नराधमांनी जबरदस्तीने अत्याचार केला.
तिने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर केस मागे घे असा दम देत तिच्या 10 वर्षाच्या मुलीच्या अंगावर एकाने पेट्रोल फेकले व तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला.

ही घटणा गुरूवारी (दि. 13) सकाळी साडेदहा वाजणेच्या सुमारास पारनेर तालुक्यातील वाघुंडे शिवारात घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोघा आरोपींना सुपा पोलिसांनी अटक केली आहे.
त्यातील एकाला सोमवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्याला 18 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.तर एकाला चौकशी कामी ताब्यात घेतले आहे.
राजाराम गणपत तरटे व अमोल राजाराम तरटे (दोघे रा. पळवे खु.ता.पारनेर) अशी आरोपींची नावे आहेत. या बाबत माहीती अशी की, फिर्यादी व तीची छोटी मुलगी गुरूवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास त्यांच्या वाघुंडे शिवारात असलेल्या
कोपीत जेवन करत होत्या. त्याच वेळी आरोपी आपल्या दुचाकीवरूऩ फिर्यादीच्या कोपीजवळ आले व त्यांनी फिर्यादीला जातीवाचक शिवीगाळ केली तसेच त्यांनी तू आमच्यावर जी बलात्काराची केस दिली आहे ती मागे घे असे म्हणाले.
त्याच वेळी फिर्यादीची छोटी 10 वर्षाची मुलगी बाहेर आली. त्यावेळी यातील आरोपी राजाराम तरटे याने त्या मुलीच्या अंगावर पेट्रोल फेकले व आरोपी अमोल तरटे याने तिच्या दिशेने पेटती काडी फेकली
त्यात फिर्यादीच्या छोट्या मुलीच्या अंगावर असलेल्या फ्रॉकने पेट घेतला त्यात ती मुलगी भाजून गंभीर जखमी झाली. हे दोघेही आम्हाला जीवे मारण्याच्या उद्देशानेच आमच्या येथे आले होते असे फिर्यादीने फिर्यादीत म्हटले आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved













