अहमदनगर Live24 टीम,19 ऑगस्ट 2020 :- नगर शहर व जिल्ह्यात मंगळवारी कोरोनामुळे आणखी १३ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या आता १८१ झाली आहे.
दरम्यान, चोवीस तासांत आणखी ६८१ रुग्ण आढळून आल्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या १४ हजार २६७ झाली. जिल्ह्यात २१ जूनपासून सातत्याने रुग्णसंख्या वाढत आहे.
गेल्या २४ तासांत जिल्हा रुग्णालयाच्या कोविड चाचणी प्रयोगशाळेत ११७, अँटीजेन चाचणीत ३५४ आणि खासगी प्रयोगशाळेत २१० बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयात नगर मनपा ७७,
पाथर्डी ३, नगर तालुका ६, श्रीरामपूर १, कॅन्टोन्मेंट ३, नेवासे २, श्रीगोंदे १, अकोले १०, राहुरी ४, शेवगाव १, कोपरगाव ३, जामखेड १ आणि मिलिटरी हॉस्पिटलमधील ५ रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत मनपा ९८, संगमनेर २४, राहाता २९, पाथर्डी १३, श्रीरामपूर १५, कॅन्टोन्मेंट १६, नेवासे ५, श्रीगोंदे २६, पारनेर ३२, राहुरी ३, कोपरगाव ५२, जामखेड ३२ आणि कर्जतच्या ९ रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत मनपा १३९, संगमनेर ५, राहाता ६, नगर ग्रामीण १६, श्रीरामपूर २, कॅन्टोन्मेंट ११, नेवासे ८, श्रीगोंदे ४, पारनेर ९, राहुरी २,
शेवगाव २, कोपरगाव १, जामखेड २ आणि कर्जतच्या ३ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात मंगळवारी कोरोनामुळे आणखी १३ जणांचा मृत्यू झाला. कोरोना बळींची संख्या आता १८१ झाली आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved