कर्जत – पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी मतदारसंघातील कर्जत-जामखेड तालुक्यातील गावागावात विकास कामांचा हिशोब देणारे फ्लेक्स लावले आहेत.
यामध्ये गेल्या दोन टर्ममध्ये केलेल्या सार्वजनिक तसेच वैयक्तिक कामांचा लेखाजोखा मांडलेला आहे. मात्र अपूर्ण कामे, कामांचा निकृष्ट दर्जा आदी मुद्दे घेत या फ्लेक्सबाजीवर सोशल मीडियातून जोरदार टीका होत आहे.
ना. शिंदे यांनी गावागावातील विविध कामांवर कोट्यवधी रुपयांच्या निधीचा कालावधीनिहाय लेखाजोखा फ्लेक्समधून मांडला आहे.
“काम दमदार राम शिंदे पुन्हा आमदार’ अशी टॅगलाईन फ्लेक्सवर झळकत आहे. गावागावातील दर्शनी भागात मोठ्या आकाराचे हे फलक लावण्यात आलेले आहेत.
फलक लावल्यापासून ग्रामस्थांनी फलकावरील विकास आणि गावात प्रत्यक्ष झालेली कामे याची शोधाशोध करायला सुरुवात केली आहे.
कामांचे भूमिपूजन झाले मात्र काम सुरू नाही, अर्धवट अवस्थेतील बंद कामे, निकृष्ट दर्जाची कामे अशा अनेक मुद्द्यावर गावात चर्चा सुरू आहे.
काही गावात तर ग्रामस्थांना झालेल्या काही कामांचा अद्यापही तपास लागलेला नसल्याचे सोशल मीडियातील प्रतिक्रियेतून दिसत आहे.
- राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना उद्यापासून सुट्टी ! पण शिक्षकांना मे महिन्याच्या ‘या’ तारखेपर्यंत शाळेत यावे लागणार
- अहिल्यानगरमधील ‘या’ ५४ ग्रामपंचायतीचा महिला चालवणार कारभार, तालुक्यातील सरपंचपदाचे महिला आरक्षण जाहीर
- सोन्याच्या किमती लाखाच्या उंबरठ्यावर, लग्नकार्य, सण-उत्सव कसे करायचे सर्वसामान्यांना पडला प्रश्न?
- निळवंडे धरणाची निर्मिती करून संगमनेरला दुष्काळमुक्त करणं हे माझं अंतिम ध्येय होतं, त्यामुळे माझं योगदान कोणीही नाकारू शकत नाही- बाळासाहेब थोरात
- सहकारी पतसंस्थांना कर्जदाराचा सिबिल स्कोर पाहता येणार? सहकारमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय!
ट्रस्टच्या नावात बदल, नोंदणी क्रमांकात गोंधळ, हेतूपरस्सर दिशाभूल करण्याचा संत शेख महंमद महाराज यांच्या वंशजावर आरोप