चाकूचा धाक दाखवून ट्रकचालकाला लुबाडले

Published on -

अहमदनगर Live24 टीम,19 ऑगस्ट 2020 :-रस्त्याच्या कडेला उभ्या ट्रकच्या चालकाला तिघा भामट्यांनी चाकूचा धाक दाखवून १ लाख ८ हजारांची रोकड व ५ हजारांचा मोबाइल लांबवला.

मनमाड मार्गावरील राहुरी फॅक्टरीच्या गुंजाळ नाक्याजवळील इंडियन पेट्रोल पंपासमोर सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली. सुनील शिरसाठ (कोल्हार खुर्द, तालुका राहुरी) हे ट्रक थांबवून टायरमधील हवा चेक करत असताना

मोटारसायकलीवर आलेल्या तिघांनी त्यांना चाकूचा धाक दाखवत रोकड व मोबाइल चोरून पोबारा केला. या घटनेची खबर मिळताच

श्रीरामपूर विभागाचे पोलिस उपअधीक्षक राहुल मदने, राहुरीचे पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पुढील तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक यशवंत राक्षे करत आहेत.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News