श्रीरामपूरच्या जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी राजीनामा द्यावा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,19 ऑगस्ट 2020 :- श्रीरामपूर नगरपलिकेच्या पाणी पुरवठा साठवण तलावात पुन्हा मृतदेह सापडल्यानंतर पालिकेच्या सत्ताधारी व विरोधी गटात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

ससाणे गटाच्या वतीने सध्याच्या नगराध्यक्षांना काहीच समजत नसल्याने पाणी पुरवठा व्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचा आरोप काँग्रेस नगरसेवकांनी केला आहे त्यामुळे श्रीरामपूरच्या जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली,

तर विरोधकांनी गावांमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे केली होती. यासाठी शासकीय नियमांची पायमल्ली त्यांनी केली होती. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची ही कामे त्यांना पाडावी लागली. त्यामुळे विरोधकांना पोटशूळ उठला असल्याचा आरोप सत्ताधारी गटाने केला.

याबाबत पालिकेतील विरोधी ससाणे गटाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले होते, जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्र दररोज स्वच्छ पाणी पुरवठा करणारे शहर म्हणून श्रीरामपूर नगरपालिकेची ओळख होती. मात्र सध्याच्या नगराध्यक्षाना काहीच समजत नसल्याने पाणी पुरवठा व्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचा आरोप काँग्रेस नगरसेवकांनी केला.

त्यामुळे श्रीरामपूरच्या जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी राजीनामा द्यावा. कारण गेल्या पंधरा दिवसांपासून शहरातील जनतेला घाण वास व चव असलेले पिण्याचे पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, असे असतानाच साठवण तलावात पुन्हा एकदा मृतदेह सापडला.

याऊलट पालिकेचा साठवण तलाव हा गाया, म्हशींचा गोठा झाला आहे. शेजारी राहणारे लोक त्यांची जनावरे तळ्यात बांधत आहे. त्याकडे पालिका प्रशासन डोळे झाक करत आहेत.

सत्तेत येऊन जवळपास चार वर्षांचा कालावधी उलटला असून तरी देखील नगराध्यक्षांना आपली जबाबदारी समजली नाही. कुठलेही विकासाचे धोरण नाही फक्त आणि फक्त सूडबुद्धीचे राजकारण हा एकमेव हेतूने सत्ताधारी काम करत असल्याचा आरोप या नगरसेवकांनी केला.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment