कोरोनामुळे बँकेच्या शाखा व्यवस्थापकाचा मृत्यू !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,19 ऑगस्ट 2020 :-  कोपरगाव मध्ये मंगळवारी पहाटे येथील बडोदा बँकेचे शाखा व्यवस्थापक छत्रपती धोंगडी (वय ५४) यांचा कोरोनाने नागपूर येथे बळी गेल्याची माहिती हाती आली. आता कोपरगाव तालुक्यात बळींची संख्या आठ झाली.

दरम्यान, तालुका प्रशासनाने बडोदा बँक बंद करण्याचा निर्णय घेतला असून बँकेत असणारे सहा अधिकारी व सात कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन कोविड सेंटर येथे तपासणीसाठी त्यांची रवानगी केली.

काल पुन्हा एकदा ९५ स्त्राव तपासणीनंतर बाधितांचा आकडा ३३ ने वाढला. चांदेकसारे येथील ५७ वर्षीय महिला व कोपरगाव टाकळी नाका येथील ७५ वर्षीय पुरुष असे दोघांचे निधन झाले असताना ही दुर्दैवी घटना उघड झाली आहे.

बडोदा बँकेचे व्यवस्थापक छत्रपती धोंगडी हे पंधरा दिवसांपूर्वी आपल्या घरी नागपूर येथे गेले होते. त्यांना मधुमेहसारख्या दीर्घ व्याधी असल्याने व तिकडेच त्यांना कोरोनाची लागण झाली होती.

त्यांना रुग्णालयात उपचासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची पहाटे पाचच्या सुमारास प्राणज्योत मालवली. ते तीन वर्षांपूर्वी बडोदा बँकेच्या कोपरगाव शाखेत आपल्या कर्तव्यावर हजर झाले होते.

शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांनी आपली तालुक्यात ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनाने बँकेचे अधिकारी, कर्मचारी, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक यांनी दुःख व्यक्त केले.

कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या ४५७ झाली. त्यात ११९ रुग्ण सक्रीय आहेत, तर आतापर्यंत ८ जणांचे कोरोनाने निधन झाले.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment