के. के. रेंजच्या प्रश्नाबाबत नामदार प्राजक्त तनपुरे म्हणाले….

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :- के. के. रेंजच्या विस्तारीकरणाबाबत जनतेच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण करण्यापेक्षा या प्रश्नावर सर्व पक्षांनी एकत्र येऊन तीव्र लढा उभा करावा.

या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी अग्रभागी राहीन, असे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी, नगर, पारनेरच्या शेतकऱ्यांना सांगितले.

के. के. रेंज प्रश्नी भूमिका मांडण्यासाठी बुधवारी कृषी विद्यापीठात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जि. प. सदस्य धनराज गाडे उपस्थित होते.

मंत्री तनपुरे म्हणाले, राहुरी, नगर व पारनेर तालुक्यात के. के. रेंजच्या प्रस्तावित विस्तारीकरण क्षेत्रातील गावांत सैन्य दलाचे अधिकारी सर्वेक्षण करीत आहेत. नागरिकांनी घाबरू नये. या प्रश्नावर माझ्यासह आमदार नीलेश लंके,

धनराज गाडे तीव्र विरोध करू. संरक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची मंगळवारी भेट घेण्याचा प्रयत्न केला. ते शनिवारी भेटणार अाहेत.

खासदार डॉ. सुजय विखे यांनी या प्रश्नाबाबत भाजपच्या काही नेत्यांना घेऊन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंग यांची भेट घेतल्याचे माध्यमातून समजले. आपणही राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांची आमदार नीलेश लंके,

जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे यांच्या समवेत भेट घेऊन त्यांना वस्तुस्थितीची कल्पना दिली. संरक्षण मंत्री राजनाथसिंग यांची भेट घेऊन मार्ग काढू असा शब्द त्यांनी दिला आहे, असे तनपुरे यांनी सांगितले.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment