धक्कादायक : बेरोजगारीला कंटाळून तरुणाने संपवले जीवन

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :-  श्रीरामपूर तालुक्यातील भोकर परिसरातील कैलास भानुदास शिंदे (वय ३०) याने मंगळवारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

मोलमजुरी करुन तो कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. विवाहानंतर त्याने श्रीरामपूर, नगर येथे मोलमजुरी केली. लाॅकडाऊनमुळे काम थांबल्याने तो आर्थिक अडचणीत आला.

बेरोजगारी आणि आजारपणाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याची चर्चा आहे. घरातील छताच्या पाइपला दोरीने गळफास घेत कैलासने जीवन संपवले.

त्याच्यामागे आई-वडील, पत्नी, पाच मुली आणि भाऊ असा परिवार आहे. पोलिस निरीक्षक मसूद खान यांनी घटनास्थळी भेट दिली.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment