आमदार रोहित पवारांच्या पाठपुराव्याला आले यश !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :-  राजमाता अहल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाच्या प्रांगणात अहल्याबाई होळकर यांचा भव्य पुतळा उभा करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते तथा कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली होती.

या मागणीची दखल घेत शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठक घेत अहल्याबाई होळकर यांचा भव्य पुतळा शासनाच्या वतीने लवकरच उभा करण्याचे जाहीर केले.

राजमाता अहल्याबाई होळकर विद्यापीठात लोकवर्गणी करून पुतळा उभा करण्याबाबत कुलगुरू मृणाली फडणीस यांनी समिती स्थापन केली होती.

मात्र महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठात महापुरुषांचे पुतळे शासकीय निधीतून झाले आहेत. मग अहल्याबाई होळकर यांचा पुतळा शासकीय निधीतून व्हावा, अशी मागणी होत होती.

याबाबत आमदार रोहित पवार यांनी शिक्षणमंत्री उदय सामंत यांना भेटून सोलापूर विद्यापीठात अहल्याबाई होळकर यांचा पुतळा शासकीय खर्चाने उभा करावा, अशी मागणी नुकतीच केली होती.

मंत्री उदय सामंत यांनी याबाबत व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून विद्यापीठाच्या कुलगुरू मृणाली फडणीस, आमदार रोहित पवार, अहल्याबाई होळकर यांचे वंशज अक्षय शिंदे,

राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख, उपाध्यक्ष सूरज चव्हाण यांची बैठक घेतली.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment