अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :- अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी राहत्या घरात आत्महत्या केली. आता या प्रकरणाचा तपास आता सीबीआय करणार आहे. काल सर्वोच्च न्यायालयानं याबद्दलचे आदेश दिले आहेत.
या आदेशानंतर भाजपच्या नेत्यांनी सरकारला लक्ष केले असून महाविकास आघाडीतील नेते सुद्धा आता मैदानात उतरले असल्याचे चित्र आहे.
या संदर्भात बोलताना राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा नामोल्लेख टाळत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, ‘पाच वर्ष भाजपची सत्ता होती. तेव्हा गृहखातं मुख्यमंत्री यांच्याकडे होतं.
आता त्याच पोलिसांवर त्यांनी आरोप करणे हे कितपत संयुक्तिक आहे?’, एका दिवसात पोलिसांची भूमिका बदलत नसते,’ असा टोला लगावत राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी
सुशांतसिंह प्रकरणावरून राज्य सरकारवर आरोप करणाऱ्या भाजप नेत्यांचा समाचार घेतला. तनपुरे काल जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपास हा सीबीआयकडे देण्याचा निर्णय आज सुप्रीम कोर्टाने दिला आहे. त्यावर तनपुरे यांना विचारले असता ते म्हणाले, ‘खरंतर मी एका व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये होतो.
मी त्यात पीक विम्याची माहिती घेत होतो. त्यामुळे सुशांतसिंह प्रकरणाबाबत आज नेमका काय निर्णय झालाय, त्याची मला माहिती घ्यावी लागेल. तसेच पार्थ पवार यांनी काय ट्विट केले आहे, तेही पहावे लागेल.
एखाद्या व्यक्तीने आत्महत्या केली, त्याबद्दल आपल्याला सहानुभूती आहे. त्याचा तपास करू द्यावा आणि आपण ही मतमतांतरे टाळावीत,’ असेही ते म्हणाले.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved